सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०१.२०२०
पाटण- शिक्षक हा शिक्षणाचा पाया असतो, त्याचप्रमाणे विद्यार्थी हे शिक्षणाचे खांब असतात. पाया मजबूत असला तर, खांब आपोआपच मजबूत होतात.” ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार, यासाठी शिक्षण प्रसार” हे ब्रिदवाक्य घेऊन बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची दारे सर्वांना खुली केली, व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची पहिली शाखा पाटण मध्ये सुरू केली. याच शाखेत शिकलेली १९९६ ची ई. १० वी “अ” या बॅच चा स्नेह आनंद मेळावा अर्थात गेट टूगेदर (दि.२९ डिंसेबर१९) रविवार रोजी संपन्न झाला. व आत्ताच्या पिढिच्या विद्यार्थ्यांच्या समोर याचा एक आदर्श दिसून आला. या १९९६ च्या वेळचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांचे वय आज ४० च्या घरात आहे. ते कोणत्या ना कोणत्या हुद्दयावर आहेत, मुले मुली कुठे जाँबला, कोणी डाँक्टर तर कोणी हाऊस वाईफ आहेत, परंतू ते सर्व शाळेसाठी आज २४ वर्षांनी एकत्र आलेत. आप आपली कामे, जबाबदारी विसरून एकदिलाने शाळेत एकवटले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मुले व मुली साळुंखे हायस्कूलच्या प्रांगणात जमले, व सर्वांचा परिचय झाला. प्रथम दिवंगत शिक्षक, पालक व सहकारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर साळुंखे हायस्कूलचे आत्ताचे पर्यवेक्षक व शिक्षकांचे समवेत शालेय प्रांगणात आठवण म्हणून सर्वांचा एकत्रित फोटोशूट करण्यात आला. नंतर सर्वांनी आल्पोपहार घेऊन काहीवेळ खो- खो व कबड्डी खेळ खेळले. यावेळी श्री. क्षिरसागर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यावेळेचे सर्व शिक्षक आमंत्रित केले होते, त्या शिक्षकांचा तेथे शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करणेत आला. तसेच आमच्या बॅच चे कारगिल मध्ये कर्तव्य बजावलेले श्री.अभिजित क्षीरसागर व शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालेले आमच्या बॅच चे श्री बळीराम पवार यांचा शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनोगत झाले. श्री.कदम सर यांनी संस्थेच्या ३ घोषणा दिल्या व विद्यार्थ्यांनी सर्व परिसर दणाणून सोडला. सर्वांनी आपापल्या आठवणी सांगितल्या यावेळी कधी खळखळून हसलो तर कधी गहिवरून गेलो. पूर्ण दिवस जुन्या आठवणीत सर्वजण रमून गेलो. घरी निघण्याची घाई कोणालाच झाली नाही. कार्यक्रम संपला तरी सर्वांची पावले अडखळली होती. तद्नंतर सर्वांचे आभार मानन्यात आले. व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली .
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी व मुला-मुलींच्या गाठी-भेठी घेऊन किंवा फोनवर संपर्क साधून सर्वांना एकत्रित आण्याचे काम श्री.इरफान सातारकर, शिल्पा प्रभाळे, अरूण मोरे व त्यांना साथ देणारे प्रसाद कोळी व विनायक भस्मे यांचा एकत्रित सत्कार करणेत आला. एकमेकांच्या आठवणीं सांगताना सर्वाना गहिवरून आले. तसेच वर्गातील निधन झालेल्या मित्रांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सर्वांनी उचलली आहे. तसेच श्री. विकास पवार, शिल्पा प्रभाळे यांनी सर्व शिक्षक तसेच वेळात वेळ काढून लांबून आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमास मुंबई, पुणे, नाशिक, इस्लामपूर, कोल्हापूर, चिपळूण, सातारा इत्यादी ठिकाणावरून सर्वजण उपस्थित राहिले.



















