सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२७.०१.२०२०
फलटण- तालुक्यातील खामगाव ग्रामपंचायत हद्दीतील काळुबाई नगर ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी मिळत नाही. या प्रकारामुळे हैराण झालेल्या स्थानिक महिलांनी २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात हंडा मोर्चा काढत पिण्याच्या पाणी वेळेत देण्याची मागणी केली.
खामगाव ग्रामपंचायत हद्दीतील काळूबाईनगर व परिसरातील ग्रामस्थांना २ ते ३ दिवसातून पाणी मिळत आहे ते ही कमी दाबाने पाणी येत असल्याने लांब पर्यंतच्या ग्रामस्थांना पाणी मिळत नाही पर्यायाने ग्रामस्थ विशेषताः महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष होत. असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्या वरील ग्रामस्थांना वेळेत पाणी देण्यास ग्रामपंचायतीकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही महिलांनी केला . गावच्या जवळच पाण्याने भरलेली विहीर असून सुद्धा मुबलक पाणी असून सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर जोपर्यंत पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत पानपट्टी घरपट्टी घेऊ नका असही महिलांकडून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले .तसचे खामगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व काही सदस्य गैरहजर असल्यामुळे २६ जानेवारी ग्रामसभा तहकूब करण्यात आली.



















