पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०३.२०२०
मावळ- तालुक्यातील सांगवडे गावात जालिंदर लिमन यांच्या शेतात सकाळी ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याची पिल्ले आढळुन आली. याची सविस्तर माहिती वनविभागाला कळवन्यात आली. वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी येउन पाहणी करून गेले. सांगवडे गावातील नागरिकांना काही महिन्यान पासून बिबट्या गावातील शिवारात वावरत असल्याचे जाणवत होते वन विभागाचे अधिकारी येऊन दखलही घेतली पिंजरे ही लावले होते त्यावेळेस बिबट्या हा पिंजऱ्यात आलाच नाही अत्ता काही महिन्यांनी बिबट्याची दोन सुदृढ पिल्ले ऊसाच्या शेतात आढळून आली त्या मुळे गावातील नागरिकांना मधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगवडे गावातील नागरिकांना रात्रीचे वेळी कोणी बाहेर पडू नये शेतावर जाऊ नये असा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.



















