बुलढाणा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३.३.२०२०
बुलढाणा- शहरातील रामनगर परिसरात भारतीय पोस्ट च्या साहाय्याने स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी परिसरातील नागरीकांसाठी आधार दुरुस्ती व नवीन आधार कार्ड कॅम्प चे आयोजन केले आहे.या कॅम्प चे उद्घाटन ३ मार्चला रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले.या परिसरातील नागरिकांनी आधार दुरूस्ती साठी व नविन आधार बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कॅम्प चा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन रविकांत तुपकरांनी यावेळी केले..
या प्रसंगी संयोजक पवन देशमुख, पोस्ट मास्टर सि.एल.गोसावी, राणा चंदन, गजानन नाईकवाडे, रमेश शेजोळे, प्रतीक उबरहंडे, पंकज शेजोळे यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.



















