सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०४.०३.२०२०
करमाळा- अजिंक्यराणा पाटील यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन निवडीसाठीची प्रक्रिया तेज झाली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील निमगाव हवेली येथील सोमनाथ राजेंद्र लोहार यांच नाव आघाडीवर आहे.ते राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे लढवय्या सामन्यातील असामान्य कार्यकर्ते, करमाळा तालुक्यातील निमगाव हवेली येथील धरणग्रस्त सामान्य कौटुंबिक पार्शवभूमी आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमबीए टॉपर आहेत. सध्या पुणे विद्यापीठात राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे. जबरदस्त संघटन कौशल्य, निडर, हजर जबाबी आणि प्रचंड आत्मविश्वास हेच काय ते त्यांच भांडवल. राष्ट्रवादीचे नेते अभिषेक दादा बोके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संघटनेत काम करत असताना त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची पर्वा न करता गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले आहेत. विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन फडणवीस सरकार व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शिक्षण, महिला सुरक्षा, चुकीचे कायदे इत्यादी बाबतीत अनेक आंदोलने केली आहेत. वेळो वेळी रस्त्यावर उतरून भाजपला सरकारला जाब विचारला आहे. त्यांच संघटन कौशल्य इतकं जबरदस्त की त्यांच्या एका हाकेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हजारो मुल मुली रस्त्यावर लोकांच्या प्रश्नासाठी केव्हांही येऊ शकतात. ते त्यांनी अनेक वेळा दाखवल आहे. पुणे विद्यापीठात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या अनेक विद्यार्थी मित्रांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी विंग ते मजबूत करु शकतात व पक्षाकडे तरुण वर्गाला आकर्षित करू शकतात. पक्ष मजबुतीकरनाच्या दृष्टीने हे खूप महत्वाची बाब आहे. हल्लीच त्यांनी NRC,CAB कायद्याविरोधात पुण्यात अतिशय नियोजनबद्ध आंदोलन केले ते इतके की आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताईसुध्दा यात सामिल झाल्या व ट्विटरवर स्वतः त्यांच वयक्तिकरित्या कौतुक केलं होत, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली ही थाप फक्त त्याच्या पाठीवर नव्हती तर ती राज्यातील समस्त लढवय्ये कार्यकर्त्यावर होती याचा सोलापूर व विशेषतः करमाळा वासीयांना सार्थ अभिमान व गर्व आहे. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विध्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड ही पक्षसंघटनेच्या वाढीसाठी व हितासाठी निश्चितच भरीव निश्चितच राहनार आहे. त्यांच्या पक्ष संघटनेच्या कामाची कदर व दखल पक्ष निश्चितच घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विध्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.



















