नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०३.२०२०
येवला- जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित, एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येवला येथे एन.व्ही.पी. मंडळ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव आयोजित यु.जी.सी. परामर्श नॅक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे अध्यक्ष स्थानी होते. उपप्राचार्य प्रा. सुनिल खैरनार तसेच लासलगाव महाविद्यालयातील नॅक कॉडिनेटर डॉ. संजय निकम, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. सोमनाथ आरोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. महाविद्यालया तर्फे वरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनिल खैरनार यांनी केले. व पाहुण्याचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे यांनी केला. प्रथम सत्राचे प्रमुख पाहुणे लासलगाव महाविद्यालयाचे नॅक कॉडिनेटर डॉ. संजय निकम यांनी कार्यशाळेच्या माध्यमातुन प्रत्येक महाविद्यालयास नॅक करणे बंधनकारक आहे, त्या शिवाय पर्याय नाही. पी.पी.टी. च्या सादरीकरणावरून नॅक विषयी सखोल माहिती प्राध्यापकांना देण्याचे कार्य सरांनी केले. दुसऱ्या सत्रात लासलगाव महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. सोमनाथ आरोटे यांनी महाविद्यालयाची नॅक करतांना कोणकोणत्या अडचणी येतील व त्या आपण कशा पद्धतीने सोडवाच्या या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापकांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. करंजकर एस. एम. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे यांनी मानले. या प्रसंगी प्रा.माधव बनकर, प्रा. ठाकरे एस. बी. प्रा. धनगे जी. बी., प्रा. ललित घाडगे, प्रा. नितीन साळवे, प्रा. दिपक मढवई, प्रा. काथेपुरे जी. पी., प्रा. संतोष आहेर, प्रा. अमोल पवार, प्रा. सुनिल पवार, प्रा. मोहित गवारे, प्रा. अजय आदमाने, प्रा. बाबासाहेब गाडेकर, प्रा. भाऊसाहेब जाधव, प्रा. आण्णा व्हडगळ, प्रा. महेंद्र म्हसे, प्रा. लक्ष्मण देवढे, प्रा. तृप्ती काळंगे, प्रा. साळवे, प्रा. देवकर, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. निता मोरे, प्रा. जयश्री आहेर, प्रा. रचना भागवत, प्रा. सोमनाथ डूबे प्रा. चव्हाणके, श्री. दिपक जाधव, प्रा. कुणाल भावसार, सौ. सुखदा देवगावकर, प्रा. अफसाना कादरी, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, श्री. नवनाथ सुराळकर, श्री. श्रावण गायकवाड, श्री. किरण मुंढे व श्री. प्रवीण मोरे सौ. मेनकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.



















