सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.५.३.२०२०
फलटण- न्यू फलटण शुगर वर्कस साखर कारखान्याकडील ऊस बिलाची थकित रक्कम वसुल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असलेले घेराव आंदोलन आज जिल्हाधिऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित केल्याची माहीती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी निर्भिड पत्रकार ला दिली. न्यू फलटण शुगर वर्कस व श्री दत्त शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे थकित असलेली ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली दोन दिवसा पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर घेराव आंदोलन सुरु होते. दुसऱ्या दिवशी दुपारी शेतकऱ्यांनी चुल पेटवुन भात शिजवुन खाल्ला. संध्याकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन विषय समजुन घेत शेतकऱ्याची किती रक्कम नक्की कारखान्यकडे येणे बाकी आहे याची खात्री करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर पेमेंट करण्यास कारखान्याला भाग पाडू असे अश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
दरम्यान दि.५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात एन सी एल टी विरोधात केलेल्या अपीलमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पार्टी करण्यात आले. १५ मार्च पर्यंत श्री. दत्त शुगर मिल्सला सर्व माहिती उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे. आंदोलनाचे नेतृत्व अनिल चव्हाण, सीमाताई नरोडे, सुरेश साप्ते, मानिक बोबडे, दादा काळे, किरण जाधव आदी कार्यकर्त्यानी केले.



















