सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०५.०३.२०२०
फलटण- एचडीएफसी फायनान्स(शाखा फलटण) फायनान्स कंपनी कडून दुचाकी खरेदीसाठी सुधीर भडलकर यांनी कर्ज घेतले होते. काही तांत्रिक कारणाममुळे हफ्ता बँकेत भरला गेला नाही. याचा राग मनात धरून बँकेचा अनधिकृत वसुली कर्मचारी बजरंग खलाटे रा.(रविवार पेठ) याने फिर्यादी सुधीर भडलकर यांना चिडून जाऊन आज दुचाकीचां हफ्ता भरा नाही तर तुला तुझा घरी येवुन तुझी दुचाकी उचलून घेवून जाईल अशी फोन वर धमकी दिली. या इसमावर फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा तपास पोलिस निरीक्षक सावंत करीत आहे.
• फलटणला सावकारकीचे ग्रहण…
दुष्काळ आणि नापिकामुळे गरज म्हणून उसनवारी घेतलेले पैसे उद्या संकटाच्या दिशेने नेणार तर नाहीत ना, याची साधी पुसटशीही कल्पना फलटण तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना नव्हती म्हणून अनेकांनी गरजेपुरती सावकाराचा दाराची पायरी चढली आणि त्याच्या मागे जणू ग्रहंनच लागले एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे सावकारी या कात्रीत सापडलेल्या फलटण तालुक्यातील कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाले. सर्वसामान्य कुटुंबातील करत्या माणसाला दैनंदिन जीवन व्यतीत करताना आर्थिक कोंडीतून सुटका करण्यासाठी पैशाची उसनवारी करावी लागते अडचणीच्या काळात सहज त्याचे पाय सावकाराकडे जातात ज्या दिवशी त्यांचे पाय सावकाराच्या दाराला लागतात तेव्हापासून त्याच्या मागे जणू ग्रहणाला सुरुवात होते. पैसे देताना कर्जदाराकडून कोरा धनादेश स्टॅम्प अथवा दागिने हे सावकार स्वतःकडे ठेवून घेतात हातात पैसे मिळणे अगोदर मिळणाऱ्या रकमेतून काही पैसे व्याज म्हणून कपात केले जातात त्यानंतर पहिल्या महिन्यात दिलेल्या रकमेची वसुली दुसऱ्या महिन्यापासून अवाजवी व्याज लावून वसुली करायाला सुरुवात करतात. चक्रवाढ व्याज फेडता करताना कर्जदाराला नाकीनऊ येते एखादा महिना चुकत असेल तर त्याप्रसंगी त्यावेळच्या अजूनही व्याज घेतात व्याजाचे पैसे वेळेवर नाही दिली तर त्या घरची घर जमीन नावावर करून घेणे दमदाटी करणे, शिवीगाळ करणे जागा जमीन बळकावणे असे प्रकार सुरू असतात अशा प्रकारे शेतकरी बेरोजगार तरुण छोटे-मोठे व्यवसायिक मजूर यांच्यासारख्या भोवती हा फास आवळला जात आहे सावकार वर राजकीय वरदहस्त असल्याने कर्जदारांना पोलिसात तक्रार केल्यास सावकार कडून जीव मारणेची धमकी दिली जाते. शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना फलटण तालुक्यात सावकार कडून केल्या जाणाऱ्या छळ मूळे अनेकदा कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा या अपप्रवृत्तीचा बीमोड करणेसाठी फलटण तालुका अवैद्य सावकारी दक्षता समिती स्थापन झाली आहे. तालुक्यात कोणाला काय अडचण आल्यास या समिती कडे तक्रार द्यावी असे अहवान समिती कडून करण्यात आले आहे.



















