चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०३.२०२०
नागभीड- तालुक्यातील तळोधी बा. येथील सेवा निवृत्त कर्मचारी भीमराव प्रल्हाद मेश्राम वय ७४ वर्ष यांनी एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि ०७ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ते प्राथमिक आरोग्य केंद्र तळोधी बा.येथे कार्यरत होते व तळोधी येथेच ते वास्तव्य करीत होते. त्यांची तळोधी बा. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून काही वर्षा अगोदर निवृत्त झाले ते आज दवाखान्यात जातो म्हणून घरून निघाले होते. परंतु बराच वेळ घरी न परतल्यामुळे मृत व्यक्तीच्या मुलाने त्यांची शोधाशोध केली असता सदर व्यक्तीचे मृतदेह वार्ड न.६ येथील हनुमान मंदिर जवळील विहिरीत आढळून आले. सदर विहिरीत काही वर्षातील ही तिसरी घटना असल्याची काही सुजाण नागरिकांत चर्चा आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठवून मर्ग दाखल केलेला आहे. मृतकाच्या मागे २ मुले, सुना, एक मुलगी, नातवंड, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.



















