सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०३.२०२०
पंढरपूर- श्री विठ्ठलाच्या पायाला हात आणि डोके टेकवून दर्शन घेण्याची परंपरा असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने पसरु शकतो ही शक्यता लक्षात घेवून आज सायंकाळी ७ वाजले पासून ३१ मार्च पर्यंत श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर बंद ठेवणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंदिर बंद ठेवण्याचा हा निर्णय अतिशय दुःखत आहे मात्र भाविकांच्या आणि पंढरपूर कराच्या हितासाठी हा कठोर अंत करणाने निर्णय घ्यावा लागत असल्याचे औसेकर यांनी दाटल्या कंठा नी सांगितले. यापूर्वी अशा प्रकारे मंदिर बंद करण्याची वेळ कधीही आली नव्हती असेही औसेकर यांनी स्पष्ट केले.
दि.१७ ते ३१ मार्च या कलावधी दरम्यान मंदिर बंद राहील मात्र देवाचे नित्य उपचार आणि धार्मिक विधी नेहमी प्रमाणे सुरुच राहतील.
येत्या ४ एप्रिल रोजी चैत्री वारी आहे या वारी बाबत अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. कोरोनाचे वातावरण पाहून वारी बाबत निर्णय घेतला जाईल असे औसेकर यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषद प्रसंगी मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे, शकुंतला नडगिरे, प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.



















