नाशिक(निर्भिड प्रतिनिधी न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,महेश दारुंटे
दि.२०.०३.२०२०
येवला- ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम गुरु कुलास कांगारूजऑल इंडिया आर्ट कॉम्पिटिशन या चित्रकला नामांकित संस्थेतर्फे जानेवारी महिन्यामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, केजी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या
सदर स्पर्धेमध्ये कलरिंग हँडरायटिंग कार्टून मेकिंग कोलाज कॉम्पटीशन ग्रिटिंग कार्ड मेकिंग निबंधलेखन मेंदी स्पर्धा इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये गुरुकुलातील एकूण एकोनपन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेत इयता दुसरीत मधील विद्यार्थी कुमार नैतिक किशोर भोसले यांनी सातही स्पर्धेत कलरिंग स्पर्धेमध्ये धनिष्ठा जाधव मयुरा जाधव तनुश्री उपासे रोशनी कोतवाल समर्थ दुसाने तर हँडरायटिंग स्पर्धेत समृद्धी गुप्ता रक्षा शिंत्रे ओम आमले कार्टून मेकिंग आर्यन बगदाने मयूर बेलदार मेहंदी स्पर्धा रुतुजा खानापुरे ग्रीटिंग कार्ड मेकिंग समीक्षा थळकरया सर्वांना गोल्डन स्टार अॅवॉर्डने विशेष प्राविण्य प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले तर इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कुमारी गीता कायस्थ उत्तेजनार्थ पारितोषिक व अनपेक्षित भेट वस्तूने सन्मानित करण्यात आले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन मॅडम कोदे यांनी केले एकूणच या उत्कृष्ट यशाबद्दल शाळेने राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीमुळे आदर्श स्कूल अॅवॉर्ड२०१९- २०२०ने सन्मानित करकरण्यात आले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक सद्गुरू माऊली संत परमानंद महाराज अध्यक्ष आत्मा मालिक ध्यानयोग मिशन श्रीनंद किशोर सूर्यवंशी मान्य अध्यक्ष मुख्य आश्रम मान्य सरचिटणीस आणि गुरुकुलाच्या अध्यक्ष श्री. हनुमंत भोंगळे साहेब, सदस्य श्री हेमंत शहा, विश्वस्त शाळेचे प्राचार्य श्री तुषार कापसे यां सर्वांनी या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .



















