सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, चंद्रकांत सुतार
दि.०१.०४.२०२०
• महिला भगिनींना आपलेसे वाटणारे गृहमंत्री: गृहमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेची चर्चा
पाटण- कोरोनोच्या पाश्वभूमीवरती राज्यामध्ये सर्वत्र संचार बंदी लागू झालेली असताना लॉकडाऊन च्या पाश्वभूमीवरती सर्व नेतेमंडळी ही आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉकडाऊन आहेत. पाटण मतदार संघाचे व जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष आमदार शंभूराज देसाई कोरोना च्या लॉकडाऊन मध्ये स्वस्थ न बसता सतत अधिकार्यांच्या संपर्का मध्ये आहेत. तालुक्यातील असो अथवा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी माझी आहे असं मत असणार्या राज्यमंत्र्यांनी आपल्या तालुक्यातील एक मुलगी चुकून पर जिल्ह्यातील एका खेडे गावामध्ये पोहचली तिची सुखरुप मायघरी पोहचवण्याचे काम त्यांनी केले. या घटनेने संपूर्ण महिला वर्गात शंभूराजे ंच्या तप्तरतेची चर्चा सुरु आहे.
सध्या सर्वत्र सोशल मिडिया मिडीयामधून वाचनामध्ये आलेल्या एका घटनेने समस्त महिला वर्गामद्ये राज्यमंत्र्या ंच्या कार्यक्षमतेची जोरदार चर्चा सुरु आहे. गृहराज्य मंत्री हे खरोखरचं महिला युवतींसाठी खंबीर आधार स्तंभ आहेत आणि आपला हक्काचा माणूस म्हणून देसाई साहेब हे नाव आत्ता चांगलं चं चर्चेत आलं आहे.
शंभूराज देसाई यांना एका संकटामध्ये सापडलेल्या युवतीचा फोन कॉल आला आणि शंभूराजेंनी तडक अँक्शन घेतली. सदर घटना अशी की, पाटण तालुक्यातील लुगडेवाडी येथील मुलगी चुकून सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावात पोहचली. तद् नंतर तिने तिच्या घरच्यांना फोन द्वारे ही हकिकत सांगितली आणि लगेचचं तालुक्याचे लोकप्रिय आमदार गृहराज्य मंत्री देसाई यांना फोन केला व सर्व हकिकत सांगितली लगेच राज्यमंत्र्यांनी सदर मुलीची माहिती घेऊन सोलापूर पोलिस विभागाशी संपर्क साधून कागदोपत्री पूर्तता करुन सदर मुलीस तिच्या घरी सुखरुप पोहचवण्यात आले.
या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून खरोखर गृहराज्य मंत्री हे महिला व युवतींच्या सुरक्षिततेसाठी तप्तर आहेत याची प्रचिती सर्वांना आली. इतर नेत्यांचे फोन हे त्यांचे स्वीय साहाय्यक घेतात मात्र अपवाद देसाई यांचा फोन हा सदैव जनतेसाठी सुरु असतो आणि त्या फोन वरती ते स्वत: बोलतात हे या घटनेवरुन दिसून आले.ते फक्त मतदारसंघाशी बोलतच नाहीत तर त्यांच्या समस्या जाणून घेतात,आणि तत्परतेने समस्या सोडवण्यावर साहेबांचा जोर असतो त्यांच्या अनेक भाषणात ते म्हणतात कि १२ महिने २४ तास हा शंभूराज तुमच्या सेवेत आहे या तालुक्याच्या जनतेसाठी अहोरात्र माझा फोन सुरु आहे आणि तो मी स्वत: घेतो. अनेकांना या बोलण्यामागे खोटं वाटलं असेल मात्र या लुगडेवाडीतील युवतीच्या घटनेने सर्वांना दाखवून दिले कि खरोखर तालुक्याचे आमदार हे तालुक्यातील जनतेसाठी तिथल्या माता भगिनींसाठी सदैव हजर आहेत.यांसारख्या अनेक घटनांमधून आपल्या कर्तव्य तत्परतेने लोकप्रतिनिधी म्हणून ते आदर्श ठरले आहेत.



















