सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०४.२०२०
महाबळेश्वर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने समस्त भारतीयांना घरात राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.महाबळेश्वर मध्ये या आवाहनास भीमसैनिकांनी चांगला प्रतिसाद देत घरातूनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भीमजयंती साजरी केली.भीमजयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री बारा वाजता समस्त महाबळेश्वर वासीयांच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तालुकाध्यक्ष सुमित कांबळे यांनी दीप प्रज्वलन केले.दुसऱ्या दिवशी सकाळी ११ :३० वाजता पुन्हा संघटनेच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी किरण शिंदे,सुमित कांबळे,गौरव काकडे हे उपस्थित होते.



















