सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.४.२०२०
फलटण- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, अत्यावश्यक बाबी व सेवा यांच्यासाठी कार्यरत असणारयानी घरामधून बाहेर पडल्यापासून परत घरी येईपर्यंत चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे. परंतू शहरी व ग्रामीण भागातील बरेचसे नागरिक मास्क न वापरता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक उपाययोजना म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन करुन मास्क परिधान न करता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना ५०० रुपये इतका दंडआकारण्याचे आदेश दिले आहेत.
या दंडाची आकारणी ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी व शहरी भागातील संबंधित नगरपालिका विभाग किंवा नगरपालिका कर्मचारी यांनी करावी. याबाबत इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित भौगोलिक क्षेत्रात दंडाची वसूली केल्यास ती त्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत कोळकी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतीने नागरिकांना मास्क वापरण्याचे जाहीर आवाहन केले आहे.



















