सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०४.२०२०
पाटण- देशातील व राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात ठेवून व त्यामुळे उदभवलेली परिस्थिती यामुळे या वर्षी होणारी पाटण ग्रामदेवता श्री. लक्ष्मी देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात सर्वच नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना यांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री.पांडुरंग देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. या बाबतीत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरो णामुळे उदभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील व राज्यातील सार्वजनिक सण समारंभ तसेच धार्मिक, उत्सव, यात्रा, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने घातलेले निर्बंध महत्त्वाचे आहेत. कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील पाटणची ग्रामदेवता असलेली श्री लक्ष्मी देवीची यात्रा दिनांक १ व २ मे रोजी भरणारी यात्रा त्या अनुषंगाने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. पुढील आदेशापर्यंत पाटणचे मंदिर बंद ठेवण्यात आले असून प्रवेश बंदी असल्यामुळे दर्शनासाठी कोणीही मंदिराकडे येऊ नये नागरिकास महिला बंधू-भगिनी तसेच भाविकांनी यात्रा आहे म्हणून मंदिराकडे न येता नैवेद्य दाखवून देवीचे स्मरण करावे जागतिक मंदीचे संकट ठेवून सर्वांना सुख समृद्धी व निरामय आरोग्य लाभावे यासाठी मंदिराकडे आत्ताच घरी थांबून प्रार्थना करावी आणि प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन श्री पांडुरंग देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.



















