सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०४.२०२०
पाटण- समर्थ सुहास चारीटेबल ट्रस्टचे नितीन पिसाळ यांच्या वतीने समर्थ सुहास चारीटेबल ट्रस्ट च्या संचालिका श्रीमती सुहासिनी पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर गरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यावेळी पाटण नगरपंचायतचे स्वच्छता कामगार तसेच ब्राह्मणपूरी, मोरे गल्ली, सिद्धार्थ कॉलनी, भडक बाबा नगर शहरातील विविध ठिकाणी वाटप करण्यात आले. या वेळेस सोशल डिस्टन्स पाळण्यात आला याप्रसंगी नितिन पिसाळ यांचे मित्र समाजसेवक डॉ. विजय साठे, दत्ताशेठ पडवळ, पाटण नगराध्यक्ष संजय चव्हाण, राजाभाऊ काळे, फत्तेसिंह पाटणकर, यशवंतराव जगताप, रविंद्र सोनवणे, जॉन्सन कुटो, राजेंद्र पाटणकर, विक्रांत कांबळे, नितीन खेरमोडे, शंकर मोहिते, अनिल बोधे, विजयकुमार गायकवाड, सचिन भिंगार्डे उपस्थित होत.



















