सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०४.२०२०
पाटण- मुस्लिम समाजामधे रमजान महीना हा पवित्र महीना मनला जातो १४०० वर्षापूर्वी पासून या महिन्याची रूढी परंपरा चालू आहेत. अल्लाहचे दूत हजरत पैगम्बर मोहम्मद(स्व.अ.) यानी इस्लाम धर्माची खरी ओळख करुण दिली. १४०० वर्षापासून या महिन्यात रोजे (उपवास) केले जातात पहाटे सूर्योदयाच्या अगोदर म्हणजेच पहाटेच्या प्रारंभीच थोडीशी न्याहरी केली जाते. त्याची वेळ पहाटेच्या आजानच्या अगोदर ५ मिनिटा पर्यत असते. आजान झाले नंतर ते पूर्ण दिवसभर कोणती ही वस्तु खानेस अथवा पिणेस वर्ज्य आहे.
पूर्ण दिवस उपाशी असताना कोणतीही वाइट वस्तुंचे विचार मनात आणने गुंन्हा आहे, जसे खोटे बोलणे, भांडने करणे, एखाद्यावर जुल्म करणे, पर स्त्री कडे वाइट नजरेने पाहने, अशा अनेक गोष्टी जी ग़ैरकृत्य आहेत त्या न करणे व आशा गोष्टीपासुन दूर रहाणे ही इस्लाम धर्माची शिकवनच आहे.
दिवस मावळतीला (सायंकाळी) म्हणजेच सूर्यास्तानन्तर रोजा (उपवास) सोडला जातो. त्यावेळेस आपण काय खावे यावर बंधने नाहीत. पैगंबर मोहम्मद (स्व.अ.) यांचे काळात खजूर व पाणी यावरच रोजा (उपवास) सोडला जात असे, त्यामुळे तीच प्रथा पुढे कालांतराने उदयास आली. त्याकाळात रोजा असून सुद्धा पापी-दुष्टि लोकांशी लढाई केली जात असे पैगम्बर मोहम्मद (स्व.अ.) स्वत: आपल्या पोटावर ३-३ दगड पोटावर बांधून लढाई कारित असत. आजच्या काळात तशी लढाई नाही, आणि तसे कड़क रोजे (उपवास) नाहीत , आज मानव सर्वकाही एका क्लिक वर मिळवू शकतो.
थोडक्यात सांगायचे झालेस इस्लाम धर्म हा संघर्षातुन गेलेला धर्म आहे. महिन्याचे शेवटी३० रोजे पुर्ण झाले नंतर एक सण साजरा केला जातो ज्याला आपण रमज़ान ईद म्हणतो. या सणादिवशी अगदी आज जन्मलेले मूल ते सर्वात वयस्कर व्यक्ति नवीन कपडे परिधान करून ईदगाह वर जातात व नमाज पठन करतात. एकमेकाला आलिंगन देवून शुभेच्छा देऊन आनंदाने सण साजरे करतात. यावर्षी कोरोना ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे त्यामुळे रमजान ईद आनंदाने साजरी व्हावी हीच निर्भिड पत्रकार कडून मुस्लिम बांधवाना सदिच्छा…



















