नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०४.२०२०
येवला- भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या आदेशाने येवला मुक्तीभूमी या ठिकाणी भारतीय बौद्धमहासभा व भारीपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सच्या नियम व शिस्तीचे पालन करून कोरोनाच्या पार्वभूमी वर देशातील लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक सर्वसामान्यांचे रोजगार बुडाल्यामुळे उदरनिर्वाहाचे प्रश्न निमार्ण झालेले आहेत. हवालदिल झालेल्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असून ऐन उन्हाळ्या हंगामात प्रखर उन्हाचा कहर आणि अशातच सर्वसामान्यांसोबत दिव्यांगावरसुद्धा अक्षरशः उपासमारीची वेळ निर्माण होण्याची परिस्थिती येऊन ठेपली आहे. हातावर पोट असणारे मोलमजुरी, छोटे गृहउद्योग, घरेलू कामगार, बेरोगारीच्या सावटाने हताश झाले आहेत. अशातच कुटुंबातील अंध, अपंग गरजूंना सांभाळणे जिकरीचे झाले असतांना परिस्थितीचे गांमभिर्य लक्षात घेऊन येवला शहरातील अशा गरजू दिव्यांगांना भाजीपाला व किराणा वाटप करून आधार दिला आहे . कोरोनाचे महायुद्ध जिंकण्यासाठी स्वच्छतेचे महत्व पटवून देत मानवीमूल्य जोपासण्याची नैतिक जबाबदारी उचलली आहे . कोरोनाला हरविण्यासाठी घरीच राहणे हा एकमेव जालीम उपाय उरला असताना ओढवलेल्या सध्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी येवला तालुका व शहरातील अनेक सेवाभावीवृत्तीचे समाजसेवक तसेच सेवाभावी संस्था पुढेयेऊन अन्नदान व किराणा, रेशन वाटप करत आहेत हातावर पोट असणाऱ्या गरजूंना मदत करत आहेत या सर्वांचे कौतुक करत आंबेडकरी चळवळीच्या वतीने मानवीहीतासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व बांधवांचे आभारही व्यक्त करण्यात आले . अंध, अपंगांना भाजीपाला व किराणा वाटपासाठी भाऊसाहेब जाधव , भारीपचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, नवचेतना अॅकॅडमीचे संचालक प्रा. जितेश पगारे भाऊसाहेब झाल्टे, अमोल पगारे, कडूभाऊ गरुड, दीपक गरुड, अमित भावसार, सलिम काझी या सर्व कार्यकत्यांनी पुढाकार घेऊन लॉकडाऊन काळात मदतीसाठी एक पाऊल उचलले आहे.



















