सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०४.२०२०
करमाळा- राज्यात कोरोणाच्या साथीने थैमान घातले आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पोथरे तालुका करमाळा येथील युवक वर्गाने रक्तदान शिबिर आयोजित करून प्रतिसाद दिला. यासाठी हरिचंद्र झिंजाडे, राज झिंजाडे, यांच्यासह अनेक युवकांनी पुढाकार घेऊन लोकांना रक्तदानासाठी प्रेरित केले. व रक्तदान शिबिर आयोजित केले. या शिबिरात तब्बल ७८ लोकांनी रक्तदान केले. सर्व रक्तदाते व रक्त संकलन करणाऱ्या पंढरपूर ब्लड बॅकेचे आभार नितीन झिंजाडे सदस्य, प्रदेश कार्यकारिणी राष्ट्रवादी पदवीधर संघ यांनी मानले. अशा काळात रक्तदान केल्यामुळे निर्भिड पत्रकार संतोष पवार कडून देखील रक्तदात्यांचे व रक्त संकलन करणाऱ्या ब्लड बँकेचे आभार व्यक्त केले जात आहे.



















