सातारा (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, चंद्रकांत सुतार
दि.३०.०४.२०२०
पाटण- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संचारबंदी करण्यात आली असून संचारबंदीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे ९५०० ग्रामीण आणि डोंगरी भागातील रोजगार बंद झालेल्या गोरगरीब कुटुंबांना तसेच हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना शिवसेना पक्षाच्या वतीने व राज्याचे गृहराज्यमंत्री मात्र. नामदार श्री.शंभुराजे देसाई साहेब यांच्या वतीने १०-१० किलोचे पॅकेट तयार करून धान्याचे वाटप करण्यास सुरूवात करण्यात आली असून हातावर पोट असलेल्या कुटुंबांना संचारबंदीच्या काळात गृहराज्यमंत्री मात्र. नामदार शंभुराजे देसाई यांनी मायेचा आधार दिला आहे. या पॅकेटमध्ये गहू, तांदूळ, डाळ,तेल, साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागामध्ये गृहराज्यमंत्री देसाई साहेबांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत ही धान्याची पॅकेट प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांगावांमध्ये व वाडीवस्तीमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून या धान्याच्या वाटपास सुरूवात करण्यात आली आहे.



















