सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.४.२०२०
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व तयारीची आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार शेतकऱ्यांचे प्रश्नावर बोलत होते. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, कृषी विभागाने नियोजन करून शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात करावी, अश्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी मांडल्या. यावेळी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले, कृषी विभागाने समन्वय साधून रासायनिक खते, बी-बियाणे, शेतीशी संबंधित अवजारे, फवारणी यंत्रे व कीटकनाशके आदी बाबींची शेतकऱ्यांना उपलब्धता करून देताना पीकविमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा सहज आणि सुलभ पद्धतीने कसा काढता येईल, यादृष्टीने नियोजन करावे. सोबतच बोगस बियाणे जिल्ह्याचे येणार नाही याची खबरदारी घ्यावी बोगस बियाणे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे खते बियाण्यांचा साठा करून कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये व चढ्या दराने खते बी बियाणे विक्री करू नये असा प्रकार करतांना आढळल्यास कृषी सेवा केंद्र चालकांची गैर करू नये अश्या सूचना करून पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचे आमदार देवेंद्र भुयार यांनी लक्ष वेधले. पारंपरिक पिकांसोबतच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास प्रोत्साहित करावे. सोबतच उत्सुक शेतकऱ्यांसाठी या योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत बागायती पिकांमध्ये उत्सुक असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी करून घेऊन योजनेचा लक्षांक वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर भर द्यावा सोबतच ज्या मोर्शी वरुड तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून दुष्काळाच्या झळा सोसत शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून संत्रा बाग जागविल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन प्रलंबित असतील, त्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज कनेक्शन द्यावे, शेतकऱ्यांच्या बोर च्या नोंदी सातबाऱ्यावर घेऊन त्यांना वीज कानेक्शन देण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्याकरिता ६३ ऐवजी १०० चे रोहित्र बसवून द्यावे, शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन कापू नये शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन कापल्यास माफ करणार नसल्याचा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला. शेतकऱ्यांना बॅंकांनी पीक कर्ज वाटप करावे, पीक कर्ज देतांना कागदपत्रांच्या अडचणी आणू नये , शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात बॅंकेचे अधिकारी टाळाटाळ करीत असतील; तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. खरीप हंगाम सन २०२०-२१ करिता जे नियोजन केले आहे, त्याची कृषी विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी, मुख्यमंत्री शाश्वत योजनेचे २५ टक्के न आलेले पैसे तात्काळ मिळण्याची मागणी, शेतकऱ्यांना ऑन लाईन पद्धतीने पोहच बियाणे मिळावे , कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली आणण्याकरिता उपाय योजना करण्याची मागणी , कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस मोजण्याची क्षमता वाढवावी यासह विविध मुद्दे आमदार देवेंद्र भुयार यांनी सभेमधे मांडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.



















