सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०४.२०२०
फलटण- तालुक्यातील खामगावची यात्रा दरवर्षी चार ते पाच हजार लोकांच्या उपस्थितीत साजरी होत असते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यावर्षी जमावबंदीचे संचार बंदीचे आदेश लागू असताना सर्व गावांच्या यात्रा रद्द करण्यात यावा असा आदेश काढलेला आहे. या आदेशाचे पालन करत खामगावच्या यात्रा कमिटीने गावची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मंदिरातील पुजारी यांनी देवाची विधिवत पूजा करावी, यात्रा कमिटीच्या दोन लोकांनी या विधिवत पुजनास उपस्थित राहावे, नातेवाईकांनी गावात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील नागरिकांनी घरूनच देवाला नैवेद्य व नारळ अर्पण करावा. मंदिराबाहेर गर्दी न करता यात्रा घरीच साजरी करावी व प्रशासनास सहकार्य करावे असे फलटण तालुक्यातील खामगाव यात्रा कमिटीकडून आवाहन करण्यात आलेले आहे.