पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०४.२०२०
स्वारगेट- बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संघटनेचे पदाधिकारी रघुनाथ कदम यांचेकडून जनता वसाहत या भागामध्ये गरजूंना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असून पुणे शहराचा समावेश रेड झोन मध्ये असल्याने सर्व नागरिक लॉक डाऊन असल्याने ज्या ज्या नागरिकांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर चालतो अशा नागरिकांची उपासमार होत असून ती बघवत नसल्याने आपण गरजवंताना किराणा देऊन संकटसमयी मदतकार्य म्हणून खारीचा वाटा उचलत असल्याचे रघुनाथ कदम यांनी निर्भीड पत्रकारशी बोलताना सांगितले. तसेच अजून अनेक गरजवंत मदतीच्या प्रतीक्षेत असून ज्या दानशुराना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन संघटनेने केले असून आपली मदत गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची अपील केली आहे.या उपक्रमास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जरीचंद्र शिंदे, गौतम पायाळ,देवेंद्र रणदिवे, बापू चौरे, संदेश बनसोडे, रवींद्र गायकवाड,अनिस इनामदार, चंद्रकांत चौरे, शरद डोलारे, राहुल इंगळे, सचिन लंगर, संदीप जोगदंड, अमित माने, केतन जगताप, पंचशील सोनवणे, भारत साळवे यांचे भरीव योगदान लाभले आहे.सदर मदत ही पुण्यातील सर्वात मोठी झोपडपट्टी ज्या मध्ये १२० गल्ल्या आहेत त्या ‘जनता वसाहत’ इथे करण्यात आली.



















