चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०६.२०२०
नागभीड- सध्या कोरोनानं हाहाकार माजवला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यात नागभीड तालुक्यात व परिसरात आणखी एक संकटला शेतकरी समोर जात आहे. अवकाळी पावसामुळे येणोली गोविंदपूर सोनापूर येथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मे महिन्यात दिवसागणिक उकाडा वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसात तर उष्णेतेची लाट पसरली आहे. मात्र आज झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचा तोंडी आलेला घास पाऊसाने हिरावला आहे. डबल फसल असलेल्या धानाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास हिसकवल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. एकी कडे कोरोना ने थैमान घातले तर निसर्ग कधीच शेतकऱ्यांना सुखाने जगू देत नाही अशी अवस्था झालेली आहे व एकीकडे धानाला भाव नाही अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी काय करावं असे प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकांच्या धान कापणी पाण्यावर तरंगत आहे तर काही लोकांची पुजण्यात पाणी घुसून धानाची खूप मोठी नुकसान झालेली आहे त्याची पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला शासनाने द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून शासनाकडे जोर धरू लागली आहे.



















