पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०५.२०२०
देहूरोड- कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने अनेक कामगार ज्यांचे हातावर पोट आहे गाव, राज्य जिल्हा सोडून आलेले व परप्रांतीय मजूर यांचे होणारे हाल पाहता त्यांना एक मदतीचा हात म्हणून बाळासाहेब ओव्हाळ हे लॉक डाऊन सुरू झाल्यापासून अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत परंतू लॉकडाऊन अजून वाढत चालल्याने लोकांची होणारी उपासमार पाहता चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या पुढाकाराने २८ एप्रिल पासून कम्युनिटी किचन विकास नगर मध्ये सुरू करण्यात आले आहे. नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी साधला असता नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ म्हणाले मी ही सेवा निस्वार्थ भावनेने, माझे कर्तव्य समजून एक मदतीचा हात सर्व गरजूंपर्यंत पोचवत आहे कोणतीही प्रसिद्धी न करता शांतपणे काम करत आहे कोण काय म्हणत आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतः काय करत आहोत याकडे लक्ष द्यावे या हेतूने काम करत राहिल्यास मनाला समाधान मिळते माझा मतदार असो किंवा नसो पण तो प्रभागात आहे आणि उपाशी आहे त्याला उपाशी राहून न देण हे आमचे मार्गदर्शक आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या सूचनेच्या पालन करत आम्ही अखंडपणे सेवा करत प्रभागात कोणी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत हे कम्युनिटी किचन सुरू केले आहे. या प्रभागांमध्ये मी जनतेला आव्हान करतो जर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी उपाशी राहत असेल किंवा तिथपर्यत कोणती सोय पोचत नसेल तर शिंदे पेट्रोल पंपच्या बाजूला इंद्रप्रभा सोसायटी शॉप लाईन मध्ये माझे संपर्क कार्यालय आहे आपण तेथे येऊन भेट द्यावी किंवा आॅनलाईनच्या माध्यमातुन आपल्या अडचणी सांगावे मी नक्कीच त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन आपल्या भागात आपण प्रत्येक एरियातून सर्व लोकांची लिस्ट घेऊन त्या लोकांच्या पैकी कोणी एक किंवा दोन व्यक्ती ऑफिस जवळ येऊन रोज दुपारी साडेबारा ते दोन आणि रात्री साडेसात ते साडेआठ यादरम्यान अडीच ते तीन हजार लोकांचे जेवण घेऊन जातात आणि त्यांच्या परिसरामध्ये हे सर्वांना वाटप करून जेवण करतात त्यामुळे त्यांना आधार मिळत आहे आणि ते घरातून बाहेर न येता या कोरोणाशी लढा देण्यासाठी सक्षम पणे शासनाला साथ देत आहेत आपणही आपले येथील कोणी जर उपाशी राहत असेल तर माझ्या ऑफिसला संपर्क साधावा आणि तो ती व्यक्ती उपाशी राहणार नाही याचे आपण सर्वजण प्रभागात काळजी घेऊया पुढील शासनाचा निर्णय येईपर्यंत आपण कोणीही बाहेर पडू नये काळजी घ्या जर खूप अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडा खरच कुठे बाहेर जायचं असेल तर पास घ्या आणि गर्दी टाळा या कोरोणाला पळवा असे मत नगरसेवक ओव्हाळ यांनी व्यक्त केले.



















