सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०५.२०२०
महाबळेश्वर- संपुर्ण जगात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात पार पडली. याच दिवशी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. गौतम बुद्धांचा जन्म,त्यांचे लग्न, ज्ञानप्राप्ती, महापरिनिर्वाण या महत्वाच्या घटनांचा यामध्ये समावेश होतो.यामुळे बुद्ध पौर्णिमेला बुद्ध धम्मात अनन्यसाधारण महत्व आहे.बुद्धपौर्णिमेचा उत्सव जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.हा उत्सव महाबळेश्वर येथे सर्व बौद्ध बांधवांनी आपापल्या घरातच उत्साहात साजरा केला. सर्वांनी आपल्या घरात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिसरण व पंचशील ग्रहण केले.घरोघरी रांगोळी काढून रोषणाई करण्यात आली होती.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने महाबळेश्वर येथील बौद्ध बांधवांना खिरदान करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.खिरदान करण्यास बौद्ध परंपरेमध्ये खूप महत्त्व आहे.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वर येथे धार्मिक व सामाजिक कार्य करत आहे.या संघटनेच्या वतीने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,बुद्ध जयंती,धम्मचक्र प्रवर्तन दिन,छ.शिवाजी महाराज जयंती,म.फुले जयंती,सावित्रीमाई फुले जयंती,सर्व महापुरुषांच्या जयंती,जागतिक महिला दिन, यासह अनेक कार्यक्रम राबविले जातात.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळुन राबविलेल्या या उपक्रमाची सर्वच स्तरातून प्रशंसा होत आहे.या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे,मा.उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे,जिल्हाध्यक्ष सुमित कांबळे,सागर कांबळे,अजिंक्य कांबळे,गौरव काकडे,श्रावण कांबळे, अमोल काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.



















