नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०५.२०२०
येवला- देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनेक पद्धती अवलंबविल्या जात आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होतो. त्यात अपुरे कर्मचारी त्यामुळे अशा संकटकालिन परिस्थितीमध्ये अजूनच मोठे प्रश्न उद्भवत असतात. महाराष्ट्रात पोलिसांची संख्या पुरी आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यासाठी कायदा सुव्यवस्थेसाठी संकटकालीन प्रसंग प्रशासनाने शहरी भागात विशेष पोलिसांची व ग्रामीण भागात ग्राम रक्षण निवडणुकीचे विशेष अधिकार जिल्हादंडाधिकार्यांना द्यावेत अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोदकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आपापल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे संकट आले तर दंगा होण्याची किंवा गंभीर स्वरूपाची शांतता भंग होण्याची भीती संभवते त्यावेळेस तेथील दंडाधिकारी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या विविध कलमा शांतता भंग आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम प्राधिकरणे जमावबंदी आदेश काढतात परंतु नेहमीचे पोलीस दल रहिवासीयांचे संरक्षण करण्यासाठी वरिष्ठांचे आदेश पालन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही सुमारे पाच वर्षापासून पोलीस भरती झालेली नाही भरती झाली परंतु ती फक्त रिक्त जागांसाठी झाली. सध्या परिस्थितीमध्ये ज्येष्ठ पोलिसांना कामावर न येण्याच्या सूचना आहेत. काही पोलिस बांधव कोरोना बाधित होत आहेत. त्यामुळे अपुरे पोलीसबल (मनुष्यबळ) झाले आहेत. त्यामुळे सध्या परिस्थिती असलेल्या पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे.
आपण महाराष्ट्र पोलीस अधिनियम मधील कलम २१ प्रमाणे शहरी भागात विशेष पोलीस अधिकारी व ग्रामीण भागात कलम ६३ प्रमाणे ग्रामरक्षक पथके व विविध पदे नेमणुकी बाबतचे विशेष अधिकार त्या-त्या भागातील दंडाधिकार्यांना द्यावेत निवड झालेले पात्र तरुण तरुणींना शासनाकडून कायदेशीर प्रमाणपत्रही मिळेल असे निवड झालेले सेवाभावी ने सामाजिक बांधिलकीतून पोलिसांनी प्रमाणे आपले कर्तव्य करतील यापूर्वी मुंबई होमगार्ड अधिनियम विशेष पोलीस अधिकारी ग्राम संरक्षण पथके व महाराष्ट्र पोलीस यांचे समन्वय करण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळ स्तरावर संबंधितांना आदेश व्हावेत अशी मागणी पाटोदकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे याचं पाटोदकर यांनी तालुक्यात याच पद्धतीने पाठपुरावा करून अनेक सामाजिक काम केली आहेत त्यांच्या या मागणीमुळे पोलिसांवरील वाढलेला अधिकचा ताण कमी होईल यात शंकाच नाही.



















