सोलापुर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.३०.१२.१९
करमाळा- राज्याचे नेते अजितदादा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे करमळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात जमा झाले व आनंद व्यक्त करत जल्लोष केला. अजितदादा याना उपमुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले दिवस येतील. अशी चर्चा आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य नितीन झिंजाडे, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, धनंजय ढेरे, प्रमोद वाकळे, राजू नालबंद,आशोक कीर्वे,महेश मोरे, कादरभई दाळवाले, हनुमंत वाकळे, दिनेश कांबळे, विलास पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.



















