पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, अनिकेत जगताप
दि.१४.११.१९
मावळ- तालुक्यातील अतिवृष्टीमूळे नुकसान झालेल्या भातशेती व इतर पिकाच्या नुकसानीचा आढावा खा.श्रीरंग बारणे यांनी तहशील कार्यालय येथे घेतला या बैठकीत तहशीलदार मधुसुदन बर्गे, कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, गटविकास अधिकारी व कृषी व महसुल विभागाचे अधिकारी, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर व शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते. मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. यावेळी अतिवृष्टीमूळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या बाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वतः ४ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष जागेवर जावून भातशेतीच्या नुकसाणीची पाहणी केली होती व तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सुचना दिल्या होत्या. यांच अनुशंगाने आज खासदार बारणे यांनी तहशील कार्यालय वडगांव मावळ येथे बैठक घेवून आढावा घेतला. मावळ तालुक्यामध्ये बाधीत १७८ गावे असुन, बाधीत शेतकऱ्यांची संख्या १२७१४ आहे. या मध्ये ५३९१.१८ हेक्टर जागेवर भातशेती असुन, ४.५७ हेक्टर जागेवर भुईमूग, ०.२० हेक्टर फुल पिके, ३८.९७ हेक्टर सोयाबीन व १.८७ हेक्टर इतर पिकाचे नुकसान झाले आहे. लागवडीतील जवळपास ३३% पेक्षा जास्त विविध पिकांचे नुकसान झाल्याचे कळते. या बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णय २९ ऑगस्ट २०१९ नुसार हेक्टरी २०४०० रू नुकसान भरपाई मिळणार असून या संपुर्ण नुकसानीची भरपाई ११०कोटी ९१लाख ५५६ रूपये मिळणार आहे. या मध्ये २०७९ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असुन, त्यामध्ये अंदाजे विमा नुकसान क्षेत्र ५४३.७६ इतके असून, त्यामध्ये कर्जदार ४९८.७६ असून, बिगर कर्जदार ४५ आहे. या सर्व विमाधारक शेतकऱ्यांना त्यांची पुर्ण नुकसान भरपाई मिळणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी या बाबत संपुर्ण आढावा घेऊन बाधित एकही शेतकरी रहणार नाही यांची खबरदारी घ्यावी. तसेच टाटा पॉवरच्या क्षेत्रामधील भातशेती व इतर कारणांनी बाधित शेतकऱ्यांना रक्कम देता येत नसेल तर त्यांना विशेष बाब म्हणून आर्थिक सहाय्य मिळावे अशा सूचना दिल्या.
तहसीलदार मावळ बर्गे म्हणाले या बाबत संपुर्ण अहवाल राज्य शासनाकडे पाठविला असून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल तसेच आपण दिलेल्या सूचनांचा अमंल करून योग्य ती कारवाई केली जाईल. असे खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणाले आहे.



















