चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि.४.११.१९
चिमूर- विधानसभा क्षेत्राचे आ.कीर्तिकुमार भांगडिया यांनी आज चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील बाळापूर, देवपायली, सोनूली येथील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेती क्षेत्राची पाहणी केली.
यावेळी आ. भांगडिया यांनी पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करण्यास संबंधित तालुका प्रशासनास आणि कृषी विभागास सूचना दिल्या.
ज्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना विमा कंपनी मार्फत आणि ज्यांचा पीक विमा नसेल त्यांना शासन सरसकट त्वरित आर्थिक मदत करणार असल्याचे यावेळी आमदार भांगडिया यांनी सांगितले. विमा कंपन्यांनी पीक विमा देण्यास हयगय करू नये. पीक विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कृषी विभागाने आणि तालुका प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीकोनातून युद्ध पातळीवर कार्य करून संकटग्रस्त शेतकरी यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी यानंतर मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, तळोधी (बा) येथे भेट देऊन यासंबंधी शेतकरी यांचे समस्या जाणून घेतल्या आणि त्या त्वरित सोडविण्याच्या सूचना मंडळ कृषी अधिकारी यांना दिल्या. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी तापस्कर साहेब, मंडळ कृषी अधिकारी आमले साहेब, नायब तहसिलदार वक्ते मॅडम, भाजप जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर, जीप सदस्य संजय गजपुरे, नागभीड बाजार समिती सभापती आवेश पठाण, पस सदस्य संतोष रडके, नप बांधकाम सभापती सचिन आकुलवार, माजी सभापती इश्वर मेश्राम,नगरसेवक, शिरीष वानखेडे, डॉ. मदन अवघडे, धनराज बावनकर, राजेश घिये, अशोक ताटकर, भास्कर लोनबळे, सुनील किटे, टीमु बलदेवा, सरपंच शंकर मेश्राम, खुशाल तुपट, भोजराज नवघडे, कैलास अमृतकर, वेंका भाकरे, आनंद भरडकर, आदींसह संपूर्ण नागभीड तालुका भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



















