सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०७.२०२२
महाबळेश्वर- सदर बुरुज मोडकळीस आला असून त्याची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी किरण गोरखनाथ शिंदे संस्थापक अध्यक्ष बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य यांनी वनखात्याकडे केली होती. विल्सन पॉईंट हा शहरातील समुद्रसपाटीपासून सर्वात उंच पॉईंट असून सदर मनोरे हे ब्रिटिश कालीन असून हवामानाचा अभ्यासकरण्यासाठी तसेच सूर्योदयाचा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी बांधले गेले होते. आजही या बुरुजांमुळे विल्सन पॉइंटच्या सौंदर्यात भर पडते. अनेक नागरिक व पर्यटक या बुरुजांवर उभे राहून सूर्योदय व सूर्यास्ताचा देखावा आपल्या डोळ्यात तसेच कॅमेऱ्यात कैद करतात. तर हे मनोरे महाबळेश्वरच्या नागरिकांशी भावनेने जोडले गेले असून त्याकडे तात्काळ लक्ष देऊन दुरुस्त करून हा ऐतिहासिक नयनरम्य वारसा जपावा अशी मागणी महाबळेश्वर बचाव आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.



















