सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०७.२०२१
महाबळेश्वर- महाबळेश्वर येथील मालुसर वाडी गावाला जोडणारा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे.त्याच रस्त्यावरून मालवाहतूक करणारा ट्रक मालुसरवाडीच्या दिशेने जाताना रस्त्यावरून खाली ओढ्यात कोसळला. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी वाहनाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मालुसरवाडी येथे असलेल्या परिस्थिती प्रमाणेच काहीशी परिस्थिती सर्वच तालुकाभर असून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात असून प्रशासनाने वेळीच लक्ष घालून पुढील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कार्यवाही करण्याची व नागरिकांना मदत पोहचविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तर नेहमीच सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षित राहिल्याने महाबळेश्वरचा परिसर आजही दुर्लक्षित व दुर्गम असल्याने जनतेतून रोष व्यक्त केला जात असून या हानीस भ्रष्ट राजकारणी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.



















