कराड तालुका,प्रतिनिधी. सूरज जाधव
एक चांगला होण्यासाठी एक चांगला माणुस होणं आधी गरजेच आहे. तरच उत्तम अभिनेता होता येतं असं मत कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम, फू बाई फू फेम जयवंत भालेकर यांनी कराड येथे संकल्पनी क्रिएशन पुणे, धडपड फौंडेशन व सेवक फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अभिनय व चित्रपट निर्मिती कार्यशाळेच्या सांगता समारंभाप्रसंगी बोलताना व्यक्त केले. २५ मे ते १ जून या कालावधीत आयोजित केलेल्या या कार्यशाळेत अनेक दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक यांनी मार्गदर्शन केले. १ जून रोजी आयोजित केलेल्या समारोप कार्यक्रमात सैराट, फँड्री चे कलादिग्दर्शक संतोष संखद, वेशभूषाकार सोनाली संखद, गोल्डन टॉयलेट चे दिग्दर्शक उमेश मालन, विद्यार्थी चळवळीचे प्रवीणराजे राडे, कॉसमॉस बँकेचे महेश टिळेकर, प्रगतीशील लेखक संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष मारूती शिरतोडे, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, इ. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. मुल्ला सर, उपप्राचार्य कुंभार सर, तसेच शिबीरार्थींचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. दिनेश मेटकरी सर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विशाल शिरतोडे यांनी करून दिला. सुत्रसंचालन विक्रम शिरतोडे यांनी केले तर आभार तिक्षा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन शुभम पवार, शुभम बाबर निशा अरबुने,सुरज शिंदे, राज माळी, स्वप्निल घुटूगडे, शरू बेनकर, स्वप्निल भिसे , यांनी केले.



















