सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०४.२०२०
करमाळा- कोरोना सारख महाभयंकर संकट आपल्या देशावर असताना सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गरजु लोकांसाठी ४०२ क्विंटल धान्य दान केले. त्यातच करमाळा तालुक्यातील अर्जुननगर हे एक लहान गाव आहे या गावाने १०क्विंटल धान्य दान केले म्हणुनच आपण शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणुन ओळखतो. सर्व शेतकऱ्यांचे तसेच धान्य जमा करण्यासाठी ज्या युवकांनी पुढाकार घेतला त्यांचे तसेच जिल्हाधिकारी यांचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे निर्भिड पत्रकार कडून मनापासून आभार.



















