नाशिक (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२५.१२.१९
नाशिक- अवयवदान या विषयावर जनजागृती करणार्या स्वराज्य फाऊंडेशनला सह्याद्री पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला. जेष्ठ साहित्यिक व सकाळचे सपांदक उत्तमराव कांबळे याच्या हस्ते पुरस्कार स्वराज्य फाऊंडेशन संस्थापक व भारतीय काॅगेस शहराध्यक्ष अॅड.आकाश छाजेड यांच्यासह फाऊंडेशनच्या पदाधिकारी यांनी स्विकारला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जयप्रकाश छाजेड, कवी संतोष वाटपाडे, विनोद बोधले, योगिता खांडेकर, अभिषेक छाजेड, अविनाश गटणे, ममता छाजेड, अनुपमा मराठे, माधुरी मालपाणी, पल्लवी रकीबे यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयवदान कार्याची माहिती दिली. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जनजागृती करून जागतिक पातळीवर विक्रम करण्याचा मानस असल्याचे अॅड.आकाश छाजेङ यांनी स्पष्ट केले. यावेळी आम्रपाली चव्हाण, पीनल वानखेडे, अश्विनी देशमाने यांना ही पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले तसेच गझल गायक सुरेश वैराळकर याचा गझल रंग कार्यक्रम झाला व गझल कार्यक्रमास उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला अनेक विषयांवर चर्चासत्र, काव्यवाचन,एकपात्री प्रयोग व विविध सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविक विनोद बोधले यांनी तर सोनाली मराठे यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थाचा परिचय करून दिला.



















