नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी शांताराम दुनबळे
दि.२७.०९.१९
नाशिक- विधान सभेच्या आदर्श आचारसंहितेनुसार शासकीय योजनांतून मतदारांवर प्रभाव पडणार अनजानी बाब आचारसंहितेचा भंग करणारी ठरते परंतु शहरातील बहतांशी पेटोल पंपावर उज्ज्वला गॅस योजनेचे फलक,जाहीराती झळकत असल्याने यातून आचारसंहिता भंग होत असल्याचे आरोप होत आहे.त्याबाबत अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांना या जाहारातीच्या परवानगीची तपासणी करुन पुढील कार्यवाहीचे आदेश मनपाच्या आधकाऱ्याना दिले आहे.त्यामुळे पंप चालकांना आचारसंहिता भोवण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबरपासून लागू झाली आहे . आदर्श आचारसंहितेचे वाली आहे आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज माढरे यांनी दिले आहेत.शिवाय सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याबाबत दक्ष राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत . विशेष म्हणजे यासर्वच बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यन्वित झाला आहे.हा कक्ष विनापरवानगी पक्षांचा,उमेदवारांचा प्रचार होत असल्यास त्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा ठरु शकेल शिवाय शासकीय योजनाही सत्ताधारी पक्षाचा प्रचार करत मतदारांवर प्रभाव पाडत असल्याने त्यांचेही फलक काढणे किंवा झाकने आवश्यक आहे अथवा त्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतू केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेचे फलक पेट्रोलपंपांवर पहावयास मिळत आहेत. त्याकरीता परवानगी घेतली किंवा नाही हे तपासा असे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत.तसा पत्र व्यवहारही निवडणक विभागाने केला आहे.



















