सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१३.१०.१९
फलटण- पहिल्यांदा कारखान्याला घातलेल्या उसाचे पेमेंट अदा करा. अन्यथा मते मागायला येऊ नका.असा इशारा ऊस उत्पादक व स्वाभिमानी शेतकरी संघटना साखरवाडी यांनी स्वराज व शरयू या साखर कारखान्यांना दिला आहे.तसा इशारा दिलेला बोर्डच साखरवाडी ता.फलटण येथील चौकात लावण्यात आला आहे. स्वराज ॲग्रो इंडिया व शरयू साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने दिलेल्या इशाऱ्या यामध्ये आमचे उसाचे पेमेंट दिवाळीपूर्वी द्यावे अन्यथा निवडणुकीत मते मागण्यासाठीही येऊ नये असा इशारा देतानाच श्रीराम साखर कारखान्या पेक्षा जास्त दर देण्याची घोषणा करणाऱ्यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्या एवढा देखील ऊस दर दिला नसल्याचे खंत व्यक्त केली आहे. साखरवाडी येथे लावण्यात आलेल्या बोर्डवर असे लिहले आहे की .स्वराज व शरयू यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा. श्रीराम साखर कारखान्यापेक्षा १० रुपये जास्त ऊस दर देऊ म्हणणारे आज पर्यंत श्रीराम एवढा दर सुद्धा देऊ शकले नाहीत. आम्हा शेतकऱ्यांचे ऊस बिल दिवाळी अगोदर अदा करावे. अन्यथा येणाऱ्या विधानसभा मतदानासाठी मते मागण्या साठी येऊ नये. असा इशारा ऊस उत्पादक शेतकरी सघटना साखरवाडी व पंचक्रोशी दिला आहे.फलटण- पहिल्यांदा कारखान्याला घातलेल्या उसाचे पेमेंट अदा करा. अन्यथा मते मागायला येऊ नका.असा इशारा ऊस उत्पादक व स्वाभिमानी शेतकरी संघटना साखरवाडी यांनी स्वराज व शरयू या साखर कारखान्यांना दिला आहे.तसा इशारा दिलेला बोर्डच साखरवाडी ता.फलटण येथील चौकात लावण्यात आला आहे. स्वराज ॲग्रो इंडिया व शरयू साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने दिलेल्या इशाऱ्या यामध्ये आमचे उसाचे पेमेंट दिवाळीपूर्वी द्यावे अन्यथा निवडणुकीत मते मागण्यासाठीही येऊ नये असा इशारा देतानाच श्रीराम साखर कारखान्या पेक्षा जास्त दर देण्याची घोषणा करणाऱ्यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्या एवढा देखील ऊस दर दिला नसल्याचे खंत व्यक्त केली आहे. साखरवाडी येथे लावण्यात आलेल्या बोर्डवर असे लिहले आहे की .स्वराज व शरयू यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा. श्रीराम साखर कारखान्यापेक्षा १० रुपये जास्त ऊस दर देऊ म्हणणारे आज पर्यंत श्रीराम एवढा दर सुद्धा देऊ शकले नाहीत. आम्हा शेतकऱ्यांचे ऊस बिल दिवाळी अगोदर अदा करावे. अन्यथा येणाऱ्या विधानसभा मतदानासाठी मते मागण्या साठी येऊ नये. असा इशारा ऊस उत्पादक शेतकरी सघटना साखरवाडी व पंचक्रोशी दिला आहे.



















