उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०५.२०२०
कळंब- महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक बोर्डाच्या कळंब कार्यालयातील जनतेला माहिती देण्यासाठी सुरू केलेला फोन गेल्या अनेक दिवसांपासून आऊट ऑफ रिच आहे. तालुक्यातील अनेक ग्राहक विजसंबंधी माहिती विचारण्यासाठी वारंवार या क्रमांकावर फोन करीत असतात. मात्र सतत हा फोन बंद करण्यात येतो. अनेकदा तालुक्यातील शेतकरी,व्यापारी ,सर्वसामान्य नागरिक फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र महावितरण च्या आऊट ऑफ रिच कारभारामुळे आता सर्वच ग्राहक त्रस्त झाले आहेत…
यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता. त्यांनीही फोन घेणं टाळले… महावितरणला ग्राहकांचा फोन घेण्याची नेमकी अलर्गी का? असा सवाल ग्राहक करीत आहेत.



















