चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२८.०४.१९
चिमूर,पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत मदनापूर येथील करबडा मधील नागरिकांसाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी एटीएम मशीन लावली असून ती फक्त शोभेची आहे आणि मागील दोन वर्षांपासून बंद आहे.या कामात अनियमितपणा झाल्याचा आरोप अरुण कारमेगे यांनी केला असून चौकशी करून पूर्वरत सुरू करण्याची मागणी केली आहे.ग्राम पंचायत मदनापूर अंतर्गत गट ग्राम पंचायत आहे यात करबडा गावाचा समावेश असून सन २०१७ च्या १४ व्या वित आयोगातून पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी एटीएम मशीन मंजूर करून लावण्यात आली परंतु या कामात अनियमितपणा झाला आहे फक्त मशीन आणि शेड उभारले असून मागील दोन वर्षांपासून एटीएम द्वारे पाणी जनतेला देणे बंद आहे.याबाबत सरपंच व सचिव उडवाउडवीची उत्तरे देत असून समाधानकारक उत्तर देत नाही.उन्हाळा रखरखता सुरू झाला असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे विहिरी आटल्या असून गाळ मिश्रित पाणी जनतेच्या आरोग्यास धोकादायक आहे. आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे साठी एटीएम लावले परंतु दोन वर्षांपासून बंद का आहे हे संशय स्पद आहे. तेव्हा पंचायत समिती स्तरावरून चौकशी करून कारवाई करून एटीएम मशीन सुरू करण्याची मागणी अरुण कारमेंगे यांनी केली आहे.



















