कराड तालुका,प्रतिनिधी. सूरज जाधव
शिवसेना सातारा, सांगली संपर्क प्रमुख प्रा.नितिन बानुगडे पाटिल यांच्या आशिर्वादाने, महिला शिवसेना सातारा संपर्क संघटक कलाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सातारा जिल्हा संघटक छायाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ दोन दिवसात २२ शाखांचे उद्घाटन सोहळा सौ.कलाताई शिंदे व सौ.छायाताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. तर गोरेगाव वांगी महिला शाखेचे उद्घाटन गुरुवर्य वेताळभक्त दादासाहेब पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अंतवडी, रिसवड, इंदोली, चोरे, धावरवाडी, पाली, वराडे, शेरे स्टेशन, संजयनगर, दुशेरे, गोवारे वांगी, कातवडे वडगांव ज.स्वा, रहाटणी, गायकवाडवाडी, मसुर, शेनवडी, अभयचीवाडी, चोराडे निगडी, ब्रह्मपुरी व पुसेसावळी शाखांचा समावेश आहे,ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात, फटाकेंच्या आतिश बाजित,आरोळांच्या निनादात, व डि.जे. लावून पदाधिकाऱ्यांनचे जलोशात स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांना हळदी कुंकू व वानवाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला उप जिल्हासंघटक हेमलता शिंदे, कराड तालुका संघटक शालिनी गुणवंत, विद्या लोहार, कराड दक्षिण तालुका प्रमुख अनिता जाधव, कराड उपतालुका संघटक उज्वला साळुंखे, सोनाली पवार, मसुर विभाग संघटक जयश्री पानस्कर, नवनियुक्त पदाधिकारी शोभा लोहार, रेठरे गट संघटक सविता नागमल, पखल गट विभाग संघटक सुरेखा संघटक, पुसेसावळी, खटाव तालुका संघटक आदिंसह जेष्ठ पदाधिकारी भानुदास पोळ, रमेश चव्हाण सर, शामगावच्या सरपंच शितल गायकवाड, पोपट कांबळे, संभाजी जगताप, सतिश पाटील, विनायक भोसले, अक्षय गवळी, संजय भोसले, सचिन जाधव, महेश पाटील, सुहास शिंदे, आबासाहेब हांगे, शिवाजी शिंदे, आनंदराव देशमुख, कमलेश बोराटे, सुशांत सुर्यवंशी, हनुमंत साळुंखे, सुरेश चव्हाण उपस्थित होते.



















