निर्भिड पत्रकार
कडा प्रतिनिधी,प्रशांत जाधव.
माजलगाव तालूक्यातील वाघोरा येथील शेतकरी ऊध्दव बन्सी राऊत (वय ३५ वर्ष ) यांनी बँकेच्या कर्जाला कंटाळून स्वहत्या केल्याची घटना सोमवारी दि.२५. रात्री ऊशीरा हिवरा शिवारात घडली. ऊध्दव राऊत यांच्याकडे बँकेचे कर्ज आसल्याने ते सतत तनावात होते .त्यातच निसर्गाच्या लहरी पणामुळे शेत मालाचे ऊत्पादन घटल्याने कर्जाचा बोजा वाढतच गेला होता .त्यातच सरकारने दिलेल्या कर्ज माफी योजनेत ऊध्दव यांचे कर्ज माफ झाले नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगीतले.या मूळे तनाव ग्रस्त आसलेल्या ऊध्दव राऊत यांनी सोमवारी (दि.२५.) रात्री हिवरा शिवारातील एका बाभळीच्या झाडाला अंगातील शर्टाच्या सह्याने गळफास घेवून स्वहत्या केली मंगळवारी(दि.२६) सकाळी काही नागरीकांनी त्याच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आला.यावर गंगाधर बन्सी राऊत यांच्या फिर्यादी वरून ग्रामीन पोलीस ठाण्यात कर्जाला कंटाळून स्वहत्या केल्याचा गून्हा नोंद करण्यात आला आहे. ऊध्दव राऊत यांच्या मागे पत्नी .दोन मुली.एक मुलगा असा परीवार आहे.



















