उस्मानाबाद (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, वसीम सय्यद
दि.८.१२.१९
कळंब- सन २०१७-१८ साठी शहरातील साफसफाईसाठी २२ लाख रुपये कंत्राटदाराला देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली परंतु जुन्या काळातील सफाई देयकाचा काय संबंध अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतली होती परंतु देयक देण्याच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ सदस्यांनी याचे समर्थन केले तर शिवसेनेचे सहा नगरसेवकांनी याचा विरोध केला.
🔹मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव घ्या.
शिवाजी आप्पा कापसे यांची मागणी
शिवसेनेचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिनंदन ठराव घेण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख तथा गटनेते शिवाजी आप्पा कापसे यांनी केली त्यांच्या या मागणीला सतीश बप्पा टोणगे यांनी अनुमोदन दिले यानंतर अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला.
या सभेमध्ये रस्ते नाल्या आणि नगरपालिका प्रशासनाने बांधण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये विज उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र रोहित्र उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली मात्र २०१७ ते १८ यावर्षी झालेल्या साफसफाईचे बावीस लाख रुपये संबंधित कंत्राटदाराला लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी यावेळी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी केली त्यांच्या मागणीला शिवाजी आप्पा कापसे यांनी यांनी जोरदार विरोध करत जुने देयक देण्याचा आता संबंध नाही त्याच वेळी का देण्यात आले नाही असे त्यांनी विचारले याच प्रकरणी सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.



















