नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.४.१०.१९
येवला- केन्द्रं सरकारने देशातील कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पाहून त्यांना पुन्हा कर्ज बाजारी करून निर्यातबंदी मुळे कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असुन शासनाने निर्यातबंदी त्वरीत उठवावी अन्यथा राज्यातील सर्व शेतकरी वर्गानां सोबत घेऊन शेतकरी संघटना तीव्र आदोंलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. येवला तालुका तहसीलदार येवला शेतकरी संघटनेने दिलेले निवेदनात कांदा निर्यातबंदी मुळे दोन महिन्यांनी येणाऱ्या खरीप हंगामातील लाल कांद्याचे उत्पादनाच्या भावावर परीणाम होणार असून त्यावेळी निर्यातबंदी उठवली तरीही बाहेर देशात ग्राहक कदाचित मिळेल याची खात्री नाही.केन्द्रं सरकारच्या धरसोडी धोरणाचा फटका शेतकरी वर्गाला बसतो म्हणून केंद्र सरकारने देशातील कांदा उत्पादक शेतकरीवर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती शेतकरी संघटनेनी केली आहे. ही कांदा निर्यातबंदी सरकार ने मागे न घेतल्यास कांदा उत्पादक शेतकरी याना सोबत घेऊन शेतकरी संघटना तीव्र आदोंलन करेल व होणाऱ्या परिणामास केन्द्रं सरकार व राज्य सरकार जबाबदार राहील असे निवेदनात शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झाबंरे,संध्याताई पगारे,योगेश सोमवंशी,अरूण जाधव,बाळासाहेब गायकवाड आदींनी स्वाक्षरी केलेल्या आहेत.



















