नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०२.०३.२०२०
येवला- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केली परंतु याची सरकारी पातळीवर कुठलीही अधिकृत अधिसूचना (नोटिफिकेशन) न निघाल्याने कांद्याचे एक दिवसापुरते वाढलेले बाजार भाव पुन्हा प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रुपयांनी कमी झाल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झाला आहे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी पाठविल्याची अधिसूचना (नोटिफिकेशन) तात्काळ आजच काढावे यासाठी आज नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट मधील कांदा लिलाव महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली बंद पाडले आहेत.
आज दिवसभरात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवल्याची नोटीफिकेशन जर निघाले नाही तर पुढील दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील मार्केट कमिटी मध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले जातील याची राज्य सरकार व केंद्र सरकारने दखल घ्यावी.
सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. असे वक्तव्य शेतकऱ्यांनी केले.



















