नाशिक निर्भिड पत्रकार न्युज नेटवर) प्रतिनिधी,
दि.२१.०४.२०२०
नाशिक- जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मनेगाव धोंडविर येथे शासनस्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी ही नागरिकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे व शासकीय सूचनांचे पालन करतं नाही. कोरोना रोगाचा आपल्या गावात शिरकाव होवु नये ह्या साठी ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या वतीने पथनाट्याचा आधार घेत तालुक्यातील गावागावात कोरोना संक्रमण वाढल्यासआपणस मृत्यूची दारें खुली करण्यास कारणीभूत ठरणार आहोत हे पटवून देण्यासाठी व नागरिकांनी रोगाचा प्रादुर्भाव वाढला जावु नये यासाठी जनजागृती मनेगाव येथील ग्रामविकास अधिकारी एम बी यादव यांनी चक्क यमराजाच्या भूमिकेत गावात अवतरून अनोख्या पध्दतीने जनजागृती केली आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सदस्य यांनी ही मोहीम कौतुकास्पद ठरावी यासाठी खंबीर पणे साथदेण्याची तयारी दाखविण्यात मोलाची मदत केली आहे ग्रामविकास अधिकारी श्री एम बी यादव यांनी चक्क यमराज, तर आरोग्य विभागाचे सेवक प्रभाकर ढापसे यांनी चिञगुप्त तर ग्रामपंचायत कार्यालयाचे लिपिक श्री भाऊसाहेब सोनवणे यांनी यमदुताची भुमिका साकारली. गावागावात कोरोना व्हायरस चा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरात व ग्रामीण भागात देखील कोणत्याही प्रकारची खबरदारी नागरिकांकडून घेतली जात नसुन लोक त्यांच्या नित्य दिनक्रमात व्यस्त असल्याचे आढळून येत असल्याने शासनाकडून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्याचा आला असला तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. शासकीय सूचनांचे पालन करतं नाही म्हणून गावात यमराज भूमिकेत प्रवेश करून लाॅकङावुन चा उद्देश, सोशल ङिस्टींग, सॅनिटायझर महत्त्व घरी रहा सुरक्षित रहा, याबाबत पथनाट्यद्वारे साक्षात यमराज, यमदुत, चिञगुप्त अवतरल्याने ग्रामस्थांना कोरोना आजाराची मागॅदशॅन सूचनांचे पालन करून कोरोना विरोधीह्या लढाईत पाठबळ देण्याचा निर्णय मनेगाव व धोंडविर येथील ग्रामस्थ यांनी व्यक्त केला आहे.



















