सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१९.३.२०२०
फलटण- सध्या संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवत असणारा कोरोना व्हायरस या संबंधित विविध बातम्या आपण आजकाल रोज टीव्ही चॅनेल वर ती पाहत आहोत. त्यामुळे हा भयंकर आहे याची कल्पना आपल्याला येते परंतु भयंकर जरी असला तरी, त्याला आळा बसू शकतो हे देखील तितकेच खरे आहे. याच्यावर अजून उपचार करण्यासाठी उपाय जरी तयार झाला नसला तरीसुद्धा आपण याला टाळू शकतो परंतु यासाठी गरज आहे. शासन ज्या नियमांना आपल्यासमोर आणत आहे त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे. ग्रामीण भागातील बऱ्याच कुटुंबातील मुले, मुली, पुरुष, महिला कामानिमित्त नोकरीनिमित्त शहरात आहेत त्यांना गावाच्या दिशेने पाठवले जात आहे.त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. अशातच कोरोना व्हायरस साखरवाडीत दाखल ही अफवा होती. या अफवेमुळे साखरवाडी गावांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
प्राथमिक आरोग्य केंद्र साखरवाडी येथील डॉक्टर सोडमिसे यांची भेट घेतली के टाइम्स टीम घेतली तेव्हा डॉक्टर सोडमिसे यांनी संपूर्ण झालेला प्रकार सांगितला. शिवाय त्यावर त्यांनी केलेली उपाययोजना या संबंधित माहिती देखील दिली आणि त्यांच्याकडून असे आवाहन करण्यात आले की,
” काळजी घ्या…. घाबरू नका”
या आजारात संबंधित लागणारी प्राथमिक यंत्रणा तयार आहे. महाराष्ट्र शासनाने या सबंधित फक्त त्यांच्या नियमांना आपण आत्मसात करायचे आहे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे . काळजी घ्या, घाबरू नका .. जागरूक राहा…



















