चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०३.०५.२०२०
नागभीड- कोरोना १९ या लढ्यामध्ये गाव खेड्यावर गावातील प्रमुख नागरिक म्हणून सरपंच व ग्राम पंचायत सदस्य हे खूप मेहनत घेत आहे. कारण गाव पाथडीवर सरपंच म्हणजे गावाचा मूलभूत पाया समजला जातो परंतु कोरोना या लढ्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा विमा संरक्षण नाही व कुठल्याही प्रकारची त्यांना किट उपलब्ध नाही. आजच्या आणीबाणीच्या काळात महत्वाचे धोके पत्करून येणाऱ्या संकटाला धैर्याने तोंड देत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात आलेल्या संकटाबाबत गावखेड्यातील लोकं अजूनही अनभिज्ञ आहेत, संकटाचे परिणाम त्यांना माहिती असून सुद्धा त्याबद्दल घ्यावयाची काळजी, सुरक्षा याबाबत ग्रामपंचायत स्तरावरून सरपंच, उपसरपंच सांगत असतांना देखील ग्रामीण भागातील लोकं ऐकल्याचे निःऐकले करत असतात, येत असलेल्या गोष्टींबाबत त्यांच्या मनामध्ये नको तो गैरसमज आणि प्रचंड भीती ही वाढतांना दिसून येत आहे, ही भीती कमी करण्यासाठी, त्यांना समुपदेशन करण्यासाठी, गावाची काळजी, खबरदारी घेण्यासाठी ग्रामस्तरावर सरपंच आजच्या काळात तणावाखाली प्रचंड मेहनत घेत आहे, ते पण स्वतः कुठलीही सुरक्षा नसतांना.
आज सरपंच यांची अवस्था बघता गावासाठीच प्राणपणाने आपला पूर्ण वेळ देणारा सरपंच आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत आहे, त्यामुळे स्वतःचा तरी प्रपंच चालवायचा कसा, हा घरचा जळजळीत प्रश्न मनातच दाबून गावाच्या हितासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.सरपंच कधीच लोकांसमोर, प्रतिनिधी समोर , अधिकाऱ्यांसमोर स्वतःच्या प्रश्नांचे सादरीकरण करत नसल्याने तो आर्थिकदृष्ट्या, शारीरकदृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत होत आहे, स्वतःचे गाऱ्हाणे सांगायचे कुणाजवळ, हा प्रश्न अजूनही त्याच्यासमोर उभा असल्याने आता करायचे काय?. हा प्रश्न सरपंचाच्या मनात येत नसेल हे कशावरून?आजपर्यंतच्या काळात आणि अजूनही या आणीबाणीच्या काळात गावासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या गरजांसाठी झुंजणारा सरपंच, स्वतःचे अस्तित्व स्वतः च मिटवू पाहत आहे, असे म्हणाल्यास नवल नाही. अपेक्षा आहे ती योग्य मदतीची, मानसिक आधारांची, आणि एक प्रश्न नेहमीच पडतो, तो म्हणजे गावपातळीवर गावाचा प्रमुख म्हणून सरपंच, आणि मदतीला ग्राम पंचायत सदस्य आजच्या आणीबाणीच्या काळात महत्वाचे धोके पत्करून येणाऱ्या संकटाला धैर्याने तोंड देत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात आलेल्या संकटाबाबत गावखेड्यातील लोकं अजूनही अनभिज्ञ आहेत, संकटाचे परिणाम त्यांना माहितेयत, पण त्याबद्दल घ्यावयाची काळजी, सुरक्षा वगैरेबाबत ग्रामपंचायत स्तरावरून सरपंच, उपसरपंच सांगत असतांना देखील ग्रामीण भागातील लोकं ऐकल्याचे निःऐकले करत असतात, येत असलेल्या गोष्टींबाबत त्यांच्या मनामध्ये नको तो गैरसमज आणि प्रचंड भीती ही वाढतांना दिसून येत आहे, ही भीती कमी करण्यासाठी, त्यांना समुपदेशन करण्यासाठी, गावाची काळजी, खबरदारी घेण्यासाठी ग्रामस्तरावर सरपंच आजच्या काळात तणावाखाली प्रचंड मेहनत घेत आहे, ते पण स्वतः कुठलीही सुरक्षा नसतांना.
आज सरपंच यांची अवस्था बघता गावासाठीच प्राणपणाने आपला पूर्ण वेळ देणारा सरपंच आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत आहे, त्यामुळे स्वतःचा तरी प्रपंच चालवायचा कसा, हा घरचा जळजळीत प्रश्न मनातच दाबून गावाच्या हितासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.
सरपंच कधीच लोकांसमोर, प्रतिनिधी समोर , अधिकाऱ्यांसमोर स्वतःच्या प्रश्नांचे सादरीकरण करत नसल्याने तो आर्थिकदृष्ट्या, शारीरकदृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत होत आहे, स्वतःचे गाऱ्हाणे सांगायचे कुणाजवळ, हा यक्षप्रश्न अजूनही त्याच्यासमोर उभा असल्याने आता करायचे काय?. हा प्रश्न सरपंचाच्या मनात येत नसेल हे कशावरून?आजपर्यंतच्या काळात आणि अजूनही या आणीबाणीच्या काळात गावासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या गरजांसाठी झुंजणारा सरपंच, स्वतःचे अस्तित्व स्वतः च मिटवू पाहत आहे, असे म्हणाल्यास नवल नाही.अपेक्षा आहे ती योग्य मदतीची, मानसिक आधारांची, आणि तितकीच सहानुभूतीची गरज आज असे एका सरपंच यांनी आपले मत व आपल्या मनातील भावना सांगितले आहे.



















