सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०५.२०२०
पाटण- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांची ६१ वी पुण्यतिथी दौलतनगर ता.पाटण येथे अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. कै.वत्सलादेवी यांचे ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त मरळी ता.पाटण येथील कै.सौ.वत्सलादेवी देसाई हायस्कुलच्या प्रांगणातील पुतळ्यास तसेच “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये प्रतिमेस पुष्प्हार अर्पण करुन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईनी विनम्र अभिवादन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत साध्या पध्दतीने केवळ पुष्प्हार अर्पण करुन राज्याचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांची ६१ वी पुण्यतिथी करण्याचा निर्णय देसाईनी घेतला व पुण्यतिथीनिमित्त त्यांनी पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. कै.सौ.वत्सलादेवी यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा कार्यक्रम कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या शिष्यवृत्तीचे वितरण कोरोनाचे संकट संपल्यानंतर करण्यात येणार असल्याचे शंभूराज देसाईनी सांगितले.
यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, ॲड.डी.पी जाधव, जिल्हा परीषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, माजी सदस्य राजेंद्र चव्हाण, बबनराव भिसे, कारखान्याचे संचालक पांडूरंग नलवडे, माजी संचालक मधूकर भिसे, मरळी सरपंच राजाराम माळी, माजी सरपंच प्रवीण पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



















