नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०२.२०३०
नाशिक- गॅस महागाईमुळे खेड्यामध्ये पुन्हा चुली पेटल्या जाऊ लागल्या आहेत. धुरापसून मुक्ती व्हावी म्हणून केंद्र सरकारने उज्वला योजना सुरू केली. शंभर रुपयांत जोडणी मिळत असल्याने सुरुवातीला योजनेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. गॅस जोडणी नंतर मात्र सिलेंडर ची मागणी हळू हळू कमी होत गेली आणि पुन्हा परंपरेला अनुसरून घरोघरी मातीच्या चुली पेटल्या जाऊ लागल्या.
अनुदानित सिलिंडर किमतीत दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने आपली चूल बरी अशी भावना व आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमधील गृहिनिमधे तयार झाली आहे. चुलीसाठी सरपण मिळणे अवघड असले तरी जंगलातून कड्या आणण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी व कडू लिंब यांच्या काड्या विनापैश्याच्या मिळत असल्याने कष्ट करी महिला फांद्या काड्या गोळा करताना दिसते आहे. रेशन दुकानातून रॉकेल मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पशुधनाच्या गोवऱ्या चुली साठी वापरल्या जाऊ लागल्या आहे. सात ते आठ रुपये किलो दराचे सरपन विकत घेण्याकडे कल वाढला आहे.
येवला तालुक्यात मात्र मातीच्या चुलींची मागणी वाढलेली आहे. येवला तालुक्यात नांदूर, कुसमाडी, धामोडे,सावरगाव या भागात मोठ्या प्रमाणत मातीच्या चुली बनवल्या जातात. या मातीच्या चुलीना सध्या बाजारात मोठ्या प्रमाणत मागणी आहे. शंभर ते एकशे दहा रुपयांपर्यंत आठवडे बाजारात चुली विकल्या जाऊ लागल्या आहेत. घरात उज्वला गॅसच्या कनेक्शन असले तरी सिलेंडर परवडत नसल्याने चुलिंची मागणी वाढलेली आहे असे नांदूर गावातील सर्वसाधारण कुटुंबामधील महिलांनी सांगितले. आज घरोघरी मातीच्या चुली असल्याने गौऱ्याचे उत्पादन हे विनापैश्याचे होत असल्याने इंधनावरील खर्च वाचतो. गॅस सिलेंडर परवडत नसल्याने पुन्हा घरोघरी पारंपरिक पद्धतीने घरोघरी मातीच्या चुली पेटल्या जाऊ लागल्या आहेत.



















