महाबळेश्वर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क प्रतिनिधी,सुमित कांबळे
दि.२४.०४.२०१९
महाबळेश्वर,येथील गोगवे या गावी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी गावामधून बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.सायंकाळी सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी गावातील महिलांनी प्रबोधन पर भाषणे केली.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी जि.प.सदस्य बाळासाहेब भिलारे,बाबुराव सपकाळ,जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाबळेश्वरचे प्रशांत मोरे,सुमित कांबळे,अजय कांबळे,जिशान शारवान,गोरखनाथ शिंदे,किरण मोरे,सम्यक किरण शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.रात्री तथागत गायन पार्टी नवनाथ भोसले यांचा भिम गीतांचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमास तालुक्यातील भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देसाई यांनी केले तर आभार अभिजित कदम यांनी मानले.



















